पिंपरी – गेम खेळताना मोबाईल खाली पडल्याने तरुणावर चाकुने वार करण्यात आले आहेत. ही घटना त्रिवेणीनगर तळवडे येथे घडली.
याप्रकरणी सागर नागनाथ चौधरी (वय-19, रा. रुपीनगर, तळवडे) याने आक्‍या उर्फ बॉन्ड याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी याची त्रिवेणीनगर येथे अंडा भुर्जीची गाडी आहे. तेथे व्यवसाय करत असताना चौधरी याचा मित्र निलेश सतीश वाघमारे (वय-26, रा. रुपीनगर तळवडे) हा तेथे बसून मोबाईलवर गेम खेळत होता. यावेळी आक्‍या हा मोटर सायकलवरुन आला व त्याने निलेशच्या हातातील मोबाईल खाली पाडला. यावेळी निलेशही धक्‍क्‍याने खाली पडला असता त्याच्या पाठीत चाकूने वार केला. यावेळी सागर ही भांडणे सोडविण्यास गेला असता सागरच्याही पोटावर आरोपीने चाकुने वार केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)