मोबाईल कंपनीवर कामगारांची दगडफेक

नोएडा – येथील हिपाड या मोबाईल तयार करणाऱ्या कंपनीवर तब्बल 12,00 कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला. सेक्‍टर 63 मधील या कंपनीत शिओमी आणि ओप्पो या फोनची
निर्मिती होते.

या कंपनीतील 200 कामगारांना कोणतीही नोटीस न देता कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे कामगारांनी हिंसाचार केला असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. मात्र कंपनीकडून यावर उशीरापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया
व्यक्‍त करण्यात आली नव्हती.

-Ads-

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर बंदोबस्त वाढवला आहे. या संदर्भात कंपनीकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी पोलिस सर्वसाधारण चौकशी करत आहेत.3 ते 4 कामगारांची चौकशी करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की कामगारांच्या कंत्राटातच कामावरून कमी केले जाऊ शकते असा समावेश आहे. त्याचबरोबर कामगार पुरवणाऱ्या कंपनीला या संदर्भात माहिती देण्यात आली होती. मूळात कच्चा माल मर्यादित असल्यामुळे या कामगारांना कामावर येऊ नका, असे सांगण्यात आले होते. मात्र त्याचा कामगारांनी चुकीचा अर्थ लावून हिंसाचार केल्याचे कामगार विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)