मोबाईल असाही जीवघेणा

मोबाईलमुळे जग जवळ आले. मात्र, गैरवापरामुळे जगातून उठविण्याचे काम मोबाईलने केले आहे असे आजपर्यंत विविध घटनांमधून दिसून आले आहे. आता अशा घटनांमध्ये आणखी एक भर पडताना दिसून येतेय. यापुर्वी वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असताना अपघात झाले.

त्यावर सरकारने उपाययोजना म्हणून, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले. परंतु आता रस्त्याने चालताना मोबाईल सर्च करण्याचे तसेच बोलण्याचे प्रकार सर्रास दिसून येतात. विशेषत: जेव्हा असे प्रकार वर्दळीच्या ठिकाणी घडताना दिसून येतात तेव्हा मोबाईल आता अशा ही प्रकारे जीवघेणा झाला आहे, हे पदोपदी जाणवून येते. त्यामुळे आता नागरिकांनी चालताना मोबाईलवर बोलणे व हाताळणे टाळण्याची नवीन गरज निर्माण झाली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)