मोबाईलद्वारे माहिती मिळवून फसवणूक

पिंपरी,  (प्रतिनिधी) – मोबाईलच्या माध्यमातून माहिती मिळवून त्याद्वारे क्रेडीट कार्डचा अर्ज करून एकाची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

ब्रिजेश नंदन (वय-36, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली असून, एका अनोळखी मोबाईलवरील व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलच्या माध्यमातून फिर्यादी यांची माहिती मिळवली. तसेच, त्याद्वारे कागदपत्रे तयार करुन, फिर्यादी यांची ओळख वापरुन क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज केला. 6 एप्रिल ते 8 मे या दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ निरीक्षक अजय चांदखेडे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)