मोबाईलचोरास अटक

आळेफाटा-बेल्हे (ता. जुन्नर) येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरी करणाऱ्या एकाला मुद्देमालासह जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले. लवकुश भगवान सिंह (वय 41, रा. नारायणगाव; मूळ रा. मध्यप्रदेश) असे त्याचे नाव आहे. बेल्ह्याच्या बाजारात सोमवारी (दि. 14) बाळकृष्ण करखिले, संदीप भोर व उत्तम शेळके यांचे वेगवेगळ्या कंपनीचे 59 हजार रूपये किंमतीचे तीन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर लगेच सहायक निरीक्षक मारूती खेडकर हे गस्ती पोलिस पथकासह बाजारात आले व चोरट्यांचा शोध घेतला असता एकजण संशयित रीत्या फिरताना दिसतात पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)