मोबाइल शॉपीतून लॅपटॉप, मोबाइल लांबवले

राहाता, दि. 19 (प्रतिनिधी) – शहरातील पोलीस ठाण्यामागील मोबाइल विक्रीचेदुकान फोडून लॅपटॉपसह मोबाइलची चोरी झाली. ही घटना गुरूवारी रात्री घडली.
प्रवीण रावसाहेब मुरादे (राहणार खडकेवाके) यांनी याबाबत फिर्याद दिली. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील बोठे मार्केटमधील ओम साई मोबाइल शॉपी गुरुवारी रात्री चोरट्यांनी फोडली. आतील लॅपटॉप आणि दुरूस्तीला आलेले मोबाइल चोरट्यांनी लांबवले. पोलीस ठाण्यासमोर राहणाऱ्या विनोद वैद्य यांच्या विद्युत पंपाचीही गुरुवारी रात्री चोरी झाली. पोलीस ठाण्यालगत चोऱ्या करुन चोरांनी पोलिसांना आव्हान दिलेआहे. राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)