मोबाइल म्हणून दिला काचेचा तुकडा

दोन भामट्यांना अटक


स्वारगेट परिसरातील प्रकार

पुणे- ओएलएक्‍सवर जाहिरात बघून मोबाइल विकत घेण्यासाठी आलेल्या तरुणाकडून 20 हजार रुपये घेत पाऊमध्ये काचेचा तुकडा देऊन फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना स्वारगेट पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली आहे.

इकलाक समसुदीन कुरेशी (23), वकील नजीर मलिक (30, दोघे रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. हितेश पुरोहित (रा. सहकारनगर) याने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हितेश पुरोहितने ओएलएक्‍सवर एका मोबाइलची जाहिरात बघून तो विकत घेण्याचे ठरवले. त्यानुसार या दोन भामट्यांनी पुरोहितला गुरूवारी सकाळी स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौक येथे बोलावले. पुरोहितकडून 20 हजार रुपये घेऊन पाऊच हातात देऊन निघून गेले.

पुरोहितने पाऊच उघडले असता, त्यात काचेचा तुकडा निघाला. त्याने या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतू ते पळून जाऊ लागले. पुरोहितने त्वरीत पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. स्वारगेट पोलीस ठाण्यातील बीटमार्शल पोलीस शिपाई खांडेकर आणि चिरमे या दोघांनी मिळालेल्या माहितीनुसार, या भामट्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)