मोबाइल टॉवरच्या विरोधात महिलांचा ठिय्या

  • भिगवणमध्ये जिओच्या टॉवरला नागरिकांचा विरोध

भिगवण – भिगवण येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये उभारण्यात येत असलेल्या रिलायन्स कंपनीच्या मोबाइल टॉवरमुळे त्या भागातील नागरिकांच्या आरोग्यस धोका निर्माण होत असल्याच्या कारणावरून येथील महिलांनी आज (दि. 4) टॉवरचे काम बंद पाडण्यासाठी भिगवण ग्रामपंचायत आणि भिगवण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अतुल बबन गाडे (रा. भिगवण, प्रभाग क्र. 3) यांच्या जागेत रिलायन्सचा टॉवर उभारण्यासाठी भिगवण ग्रामपंचायतकडे परवानगी अर्ज केला होता. परवानगी मिळाल्यावर गाडे यांनी टॉवरच्या कामास सुरुवात केली. मात्र, या टॉवरमुळे आरोग्यास धोका निर्माण होणार असल्याने या भागातील नागरिक रमेश गाडे आणि इतर महिलांनी टॉवरला विरोध करत भिगवण ग्रामपंचायत, भिगवण पोलीस स्टेशन आणि इतर ठिकाणी हे काम त्वरित थांबवावे, असे तक्रार अर्ज केले. त्यानंतर ग्रामपंचायतीने अतुल गाडे आणि रिलायन्सला टॉवरसाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करीत असल्याचे पत्राने कळविले आहे.
मात्र असे असताना देखील या टॉवरचे काम सुरू केल्याने या भागातील महिलांनी आज (दि. 4) भिगवण ग्रामपंचायतीवर टॉवरचे काम बंद पाडण्यासाठी मोर्चा काढला आणि भिगवण पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या धरला. भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भानुदास पवार यांनी या महिलांची तक्रार ऐकून अतुल गाडे यास समजपत्र देऊन पुढील कामास स्थगिती दिली आहे. त्यानंतर या महिलांनी ठिय्या मागे घेतला.

अतुल गाडे यांनी टॉवर उभारणीसाठी परवानगी मागितली होती. त्यावेळी कोणाचाही विरोध नव्हता; पण या टॉवरबाबत तक्रार येताच नागरिकांच्या आरोग्यचा विचार करून त्यांना देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली असून त्यांना तसे लेखी कळविण्यात आले आहे.
– बी. एम. भागवत, ग्रामविकास अधिकारी, भिगवण

टॉवर उभारणीसाठी ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेतली होती. कंपनीशी करार करून तो पूर्ण झाल्यानंतरच कामास सरुवात केली. मात्र, भावकीच्या वादातून जाणीव पूर्वक तक्रार देण्यात आली आहे. याबाबत रीतसर न्यायालयात दाद मागणार आहे.
अतुल गाडे, भिगवण


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)