मोबाइल चोरी प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी

पुणे – मोबाइल चोरल्याप्रकरणी दोघांना अलंकार पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी बी. एस. गायकवाड यांनी दिला आहे.

समीर हज्जू पठाण (वय 26, रा. सहयोग नगर, वारजे माळवाडी) आणि राहुल गजेंद्र कांबळे (वय 19, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रस्ता) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कर्वेनगर येथे राहणाऱ्या 18 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या 31 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या मैत्रिणीसह कर्वेनगरमधील कॉसमॉस बॅंकेच्या समोरून पायी जात होत्या.

-Ads-

त्यावेळी आरोपींनी दुचाकीवरून येत त्यांचा 8 हजार रूपये किंमतीचा मोबाइल चोरला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील वैशाली पाटील यांनी केली होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)