मोबाइल ग्राहक संख्येत घट

नवी दिल्ली  -जानेवारी महिन्यात दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकांच्या संख्येत घसरण नोंदविण्यात आली. लहान कंपन्या दूरसंचार व्यवसायातून बाहेर पडत असल्याने ग्राहकांची संख्या घटत आहे. ट्रायच्या अहवालानुसार जानेवारीमध्ये दूरसंचार ग्राहकांची संख्या 117.5 कोटींवर पोहोचली.

जानेवारी महिन्यात ग्राहकांच्या संख्येत 1.32 टक्‍क्‍यांनी घसरण झाली. डिसेंबर 2017 मध्ये 119.06 कोटी असणारी संख्या 117.50 कोटींवर पोहोचली. मोबाइल वापरकर्त्यांची संख्या 1.33 टक्‍क्‍यांनी घसरली. डिसेंबरमध्ये 116.74 कोटी असणारी संख्या 115.19 कोटींवर पोहोचली.

जानेवारी महिन्यात 1.26 कोटी नवीन ग्राहकांची संख्या वाढली. यामध्ये रिलायन्स जिओ अव्वलस्थानी असून 83 लाख, भारती एअरटेलने 15 लाख व्होडाफोनने 12.82 लाख, आयडिया 11.44 लाख आणि बीएसएनएलने 3.96 लाख नवीन ग्राहक जोडले. आरकॉमने मोबाइल सेवा व्यवसाय बंद केला असून कंपनीचे 2.1 कोटी ग्राहक होते.
एअरसेलने 34 लाख, टाटा टेलिकम्युनिकेशन्सने 19 लाख, टेलेनॉरने 16 लाख, एमटीएनएलने 10,634 ग्राहक गमाविले. वायरलाईन फोनचे ग्राहक 2.32 कोटींवरून 2.3 कोटींवर पोहोचले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)