मोबाइल कंपन्या अखेर वठणीवर

भरले 39 लाखांचे जाहिरात शुल्क

पुणे – परवानगी न घेता शहरात मोबाइल दुकानांबाहेर अनधिकृतपणे जाहिराती लावणाऱ्या “विवो’ आणि “ओप्पो’ मोबाइल कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करताच या कंपन्यांनी सुमारे 39 लाखांचे जाहिरात शुल्क जाहिरातींसाठी परवानगी घेऊन महापालिकेकडे भरल्याचे समोर आले आहे.

“विवो’ कंपनीने 22 लाख 6 हजार तर “ओप्पो’ कंपनीने 16 लाख 86 हजारांचे शुल्क महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागास भरल्याची माहिती प्रशासनाने नोव्हेंबरच्या प्रश्‍नोत्तरात देण्यात आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी हा प्रश्‍न विचारलेला होता.

महापालिका हद्दीत गेल्या काही महिन्यात “ओप्पो’, “विवो’ आणि “सॅमसंग’ कंपन्यांनी मोठया प्रमाणात मोबाइलच्या दुकानांबाहेर अनधिकृत जाहिराती लावलेल्या होत्या. या कंपन्यांना नोटीस बजावून त्यांना या जाहिरातींसाठी 222 रुपये प्रति चौरसफूट शुल्क भरून परवानगी घेण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र, कंपन्यांनी नोटीसला केराची टोपली दाखविल्याने पलिकेने या कंपन्यांविरोधात थेट पोलिसांतच तक्रार दाखल केली होती. त्यामुळे धास्तावलेल्या या कंपन्यांनी तातडीने पालिकेकडे रितसर जाहिरातींसाठी परवाने घेतले आहेत. यात “विवो’ कंपनीने 235 फलकांसाठी मान्यता घेऊन 22 लाख 6 हजार 14 रुपये तर “ओप्पो’ कंपनीने 117 फलकांसाठी मान्यता घेऊन 16 लाख 86 हजार रुपये महापालिकेस भरल्याची माहिती प्रशासनाने लेखी उत्तरात दिली आहे. याशिवाय, या दोन्ही कंपन्यांच्या शहरातील 152 विनापरवाना फलकांवरही प्रशासनाने कारवाई करण्यात आलेली आहे.

दंडाच्या वसुलीचे काय ?
या कंपन्यांनी महापालिकेची परवानगी घेण्यापूर्वी शहरात मोठया प्रमाणात जाहिरात फलक लावले होते. या जाहिरात फलकांपोटी महापालिकेने या कंपन्यांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्याची नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र, या कंपन्यांकडून हा दंड वसूल करण्याबाबत काहीच कारवाई केलेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एका बाजूला कंपन्यांनी रितसर शुल्क भरून नव्याने परवानगी घेतली असली तरी, पूर्वीच्या दंडाच्या रकमेचे काम असा सवाल उपस्थित केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)