मोबाइल कंपन्यांमधील स्पर्धा वाढली

नवी दिल्ली -रिलायन्सच्या जिओ गिगा फायबरने ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सुविधा मोफत देण्याचा प्लॅन घोषित केल्यानंतर आता वोडाफोनकडून जिओला टक्‍क्‍र देण्यात येत आहे. कारण, वोडाफोनने ब्रॉडबॅण्ड ग्राहकांसाठी बरीच आकर्षक ऑफर लॉंच केली आहे. कंपनीने आपल्या यू ब्रॉडबॅण्ड सेवेतील युजर्संना 4 महिन्यांपर्यंत इंटरनेट मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

जे युजर्सं त्यांच्या ब्रॉडबॅण्ड प्लॅनसाठी 12 महिन्यांचे सबस्क्रिप्शन घेतील, त्यांना 4 महिने इंटरनेट मोफत मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या नवीन नियमानुसार 12 महिन्यांचा प्लॅन खरेदी केल्यानंतर पुढील 4 महिने मोफत सेवा मिळणार आहे. म्हणजेच, ग्राहकांना 12 महिन्यांच्या रकमेत 16 महिने ब्रॉडबॅण्ड सुविधा मिळेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)