मोबाइल कंपन्यांना पोलिसांचे अभय?

पुणे : सॅमसंग, ओप्पो आणि विवो मोबाइल या तिन्ही मोबाइल कंपन्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जाहिराती लावल्या आहेत. त्यामुळे पालिकेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. तर अशा अनधिकृत जाहिरातबाजांवर कारवाई का केली जात नाही, म्हणून न्यायालयाकडून महापालिकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

अशा स्थितीत महापालिका या कंपन्यांविरोधात जात असताना; पोलिसांकडून मात्र, महापालिकेस सहकार्य केले जात नसल्याचे चित्र आहे. त्यातच या कंपन्या बड्या आंतराष्ट्रीय दर्जाच्या असल्याने पोलिसांकडून त्यांना का पाठीशी घातले जात आहे, याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)