मोबाइल कंपन्यांच्या ताळेबंदावर अविश्‍वास 

संग्रहित छायाचित्र ...
नवी दिल्ली: मोबाइल कंपन्यांनी ताळेबंदात महसूल अयोग्यरित्या दाखविला असल्याची शंका दूरसंचार विभागाला आली असून विभागाने या ताळेबंदाचे ऑडिट करायचे ठरविले असल्याचे वृत्त आहे. हे ऑडिट 2011-12 पासून होण्याची शक्‍यता असल्यामुळे मोबाइल कंपन्यांचे धाबे दणाणण्याची शक्‍यता आहे.
महसुलाच्या आधारावर इतर कर लागतात. मात्र, या कंपन्यांनी महसूल कमी दाखविला असेल तर त्यांना कर कमी लागतो. त्यामुळे त्यांनी महसूल कमी दाखविला की काय याची शंका विभागाला आली आहे. सरकारला मिळालेल्या परवाना आणि इतर शुल्कात बरीच घट झाली असल्यामुळे हा हिशेब पुन्हा तपासला जाण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाते.
आम्ही ऑडिट करणार आहोत. त्यासाठी मोबाइल कंपन्यांना नोटीस दिली आहे, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर मोबाइल कंपन्यांकडून नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात येत आहेत. जर पुन्हा ऑडिट आले तर एक तर कंपन्यांचा बराच वेळ वाया जाणार आहे. त्याचबरोबर काही कंपन्या या विरोधात न्यायालयात जाण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर कंपन्यांचा खर्च आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर कंपन्यांत सध्या मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यात अगोदरच मोठी घट झाली आहे. दूरसंचार विभागाने अगोदरच ऑडिट केले आहे. आता पुन्हा ऑडिट केले तर कंपन्यांना त्रास होणार असल्याचे वाटते.
जर या नव्या हिशेबात कंपन्यांनी कमी महसूल दाखविला आहे असे आढळले तर नव्या महसुलाच्या आधारावर कंपन्यांकडून कर मागितला जाणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)