मोबदल्यासाठी अडीच हजार कोटींची आवश्‍यकता

विजय शिवतारे : मोबदल्याच्या पर्यायावर एकमत नाही

पुणे – पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनापोटी द्यावयाच्या पॅकेजसाठी तरतूद करण्यात येत आहे. भूसंपादनापोटी रोख स्वरुपात द्यावयाच्या मोबदल्यासाठी अडीच हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

-Ads-

राज्य सरकारने विमानतळासाठी 2 हजार 832 हेक्‍टरची हद्द निश्‍चित करून दिली आहे. तर, मे महिन्यात 3 हजार 513 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे. मात्र अजूनही पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठीचे पर्याय समोर आलेला नाही. विमानतळासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आवश्‍यक त्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. मात्र, प्रकल्पग्रस्तांना द्यायच्या मोबदल्याच्या पर्यायावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि राज्य शासनामध्ये एकमत होत नसल्याने विमानतळाचे काम थांबलेले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी विमानतळ बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा (बीओटी) तत्त्वावर करण्याबाबत राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या असल्याचे सुतोवाच मध्यंतरी शिवतारे यांनी केले होते. याविषयी अधिक माहिती देताना राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, पुरंदर विमानतळासाठीचे पॅकेजसाठी आवश्‍यक ती आर्थिक तरतूद करण्याचे काम सुरू आहे. रोख मोबदल्यासाठी अडीच हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूक पाहाता शेतकऱ्यांचा विरोध नको म्हणून, विमानतळ उभारणी एक वर्ष पुढे ढकललेली आहे का, असे विचारले असता शिवतारे म्हणाले, असे काही नाही, मोबदला लवकरच जाहीर करू. यासाठी वर्ष लागणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)