मोदी हे अॅनाकोंडा ; तेलगू देसम पक्षाच्या नेत्याची टीका

अमरावती (आंध्रप्रदेश) : नरेंद्र मोदींपेक्षा अॅनाकोंडा कोणी असू शकतो का? ते सीबीआय, आरबीआय सारख्या संस्थांना गिळंकृत करत आहेत. ते रक्षक कसे असू शकतात. मोदी हे राष्ट्रीय संस्थांना गिळंकृत करणारे अॅनाकोंडा आहेत, अशी टीका तेलगू देसम पक्षाचे नेते आणि मंत्री यनामाला रामकृष्नुदु यांनी केली आहे.

देशाला भाजपपासून वाचवणे हे आमच्या पक्षाचं कर्तव्य आहे. देश, लोकशाही आणि संवैधानिक मूल्ये जपण्याची प्राथमिक जबाबदारी आपली प्रत्येकाचीच आहे, असे आवाहनही रामकृष्नुदु यांनी केले आहे.

यनामाला रामकृष्नुदु यांनी नरेंद्र मोदींची तुलना थेट अॅनाकोंडाशी केल्यामुळे भाजपनेही रामकृष्नुदु यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलं आहे. चंद्राबाबू नायडू हे ‘भ्रष्टाचाराचे राजा’ आहेत. त्यांनी केलेला भ्रष्टाचार आता उघड होईल, असे भाजपने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)