बंगळूरू : भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी आज सकाळी ९ वाजता राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सध्या त्यांनी एकट्यानेच शपथ घेतली असून बहुमत सिद्ध केल्यानंतर इतर मंत्र्यांना शपथ दिली जाईल.

दरम्यान, शपथ घेतल्यानंतर येडियुरप्पा हे विधानसभा परिसरात पोहोचले. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते त्यांच्याबरोबर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संसदेच्या पायरीसमोर नतमस्तक होऊन प्रवेश केला होता. अगदी तसेच येडियुरप्पा हेही विधानसभेच्या पायरीसमोर नतमस्तक झाले आणि त्यांनी विधानसभेत प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)