मोदी सरकार संस्था नष्ट करीत आहे 

मुंबई – हिटलरने जर्मनीसोबत जे केले तेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतासोबत करायचे आहे, असे कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार संकुचित स्वार्थासाठी महत्त्वाच्या घटनात्मक संस्था नष्ट करीत आहे. कॉंग्रेसतर्फे आयोजित संविधान बचाव परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

भाजपाच्या नेतृत्वात देशातील परिस्थिती बिघडत आहे. मात्र कॉंग्रेस कधीही आरएसएस, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना, ज्याप्रमाणे इतर संस्था नष्ट केल्या आहेत, त्याप्रमाणे राज्यघटना नष्ट करण्यात यशस्वी होऊ देणार नाही, असे खरगे यांनी म्हटले.

राज्यघटना कोणत्याही ठराविक जात, धर्म किंवा समाजाची नसून प्रत्येक भारतीयाची आहे आणि सर्वांना समान आहे, असेही ते बोलले आहेत. तसंच भाजपा सरकारने लोकशाहीत कोणत्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर केला आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

गेल्या चार वर्षांमध्ये भाजपा योग्य दिशेने चार पावले टाकू शकलेलं नाही. त्यांना कॉंग्रेसकडे बोट दाखवून गेल्या 70 वर्षांमध्ये काय केलं आहे हे विचारण्याचा कोणताही अधिकार नाही, असे खरगे बोलले आहेत. खरगे यांनी भाजपा सत्तेत आल्यापासून अभिव्यक्तिस्वातंत्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, तसंच वारंवार प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

भाजपा देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे ऍडॉल्फ हिटरलने जर्मनीसोबत केलं तेच भारतासोबत करायचं आहे. राज्यघटना धोक्‍यात असून भाजपा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असून आपल्याला रोखायचं आहे, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. खरगे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)