मोदी सरकार मांडणार पूर्ण अर्थसंकल्प? कॉंग्रेसचा आक्षेप 

नवी दिल्ली  – लेखानुदान किंवा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्याऐवजी पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याचा मोदी सरकारचा विचार असल्याचे वृत्त पसरले आहे. सरकारच्या त्या संभाव्य पाऊलावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. सरकार येत्या 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. सरकारची मुदत संपत आल्यास लेखानुदान किंवा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्याची प्रथा आहे. मात्र, सरकार पूर्ण किंवा नियमित अर्थसंकल्प सादर करेल, असा दावा करणारे वृत्त आहे. त्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली.

सरकारचा हेतू प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारा आहे. पूर्ण अर्थसंकल्प मांडला गेल्यास भपकेबाज घोषणा करून जनतेला फसवण्यासाठी सरकारने नैराश्‍यातून उचललेले ते पाऊल ठरेल. ते पाऊल घटनेचे उल्लंघन करणारे ठरेल. निवडणुकीच्या अवघे काही महिने आधी पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची कृती सर्व नियम आणि निकषांच्या, संसदीय प्रक्रियांच्या विरोधातील ठरेल. सरकारची पाच वर्षांची मुदत मेमध्ये समाप्त होणार आहे. सरकारने पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. आता केवळ लेखानुदान मांडले जाऊ शकते. 12 महिन्यांचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सरकारचा कार्यकाळही तेवढाच असावा लागतो. त्यामुळे तीन महिन्यांचा कार्यकाळ आणि पूर्ण वर्षासाठी अर्थसंकल्प ही बाब विचित्र ठरेल, अशी भूमिका शर्मा यांनी मांडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)