मोदी सरकार पुन्हा निवडून येण्याची आवश्‍यकता – सीएलएसए

         अन्यथा भारताच्या आशादायक विकासगाथेवर होईल परिणाम

मुंबई – भारतात महत्त्वाकांक्षी आर्थिक सुधारणा चालू आहेत. निवडणुकीच्या वर्षातही जबाबदार अर्थसंकल्प सादर करणारे नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येण्याची गरज आहे. जर ते पुन्हा निवडून आले नाहीत तर भारतातील आर्थिक सुधारणावर आणि विकासदरावर परिणाम होईल असे सीएलएसए या गुंतवणूक सल्लागार संस्थेचे प्रमुख ख्रिस्तोफर वूड यांनी म्हटले आहे.
वूड याचे गुंतवणूकदारांना पाठविण्यात येणारे ग्रीड ऍण्ड फियर पत्र मोठ्या प्रमाणात वाचले जाते. यावेळी त्यांनी पत्रात म्हटले आहे की, मोदी यानी मोठी जोखीम घेऊन महत्त्वाकांक्षी सुधारणा सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्यांना अधिक कार्यकाळाची गरज आहे. अर्थसंकल्पात इतरांनी सवलती दिल्या असत्या. मात्र मोदी यांच्या सरकारच्या अर्थसंकल्पात गुंतवणूक आणि विकासावरच भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पातील 3.3 टक्‍के तूट फारशी जास्त नसल्याचे त्यांनी सांगितले.

या महिन्यात भारतात फारशी गुंतवणूक झाली नाही. कारण रोख्याची विक्री जास्त होत आहे. चालू खात्यावरील तूट वाढल्यामुळे रुपयाच्या मूल्यात मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर क्रुड महाग होत असल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. जर क्रूड वाढले तर भारतातील गुंतवणूक रशियासारख्या तेलाने समृध्द असलेल्या देशांकडे जाण्याची शक्‍यता वाढते. मात्र दिर्घ पल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी भारताच चांगला असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.

क्रूडचे वाढत असलेले भाव आणि अमेरिकेच्या व्यजदर वाढीमुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम होणार आहे. त्याकडे परदेशी गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे. ते म्हणाले की, भारतातील निर्देशांक अजूनही आवश्‍यकतेपेक्षा जस्त पातळीवर आहेत. त्यातल्या त्यात मिड कॅप जास्त पातळीवर आहेत. गेल्या महिन्यात ते कमी असले तरी ते आणखी कमी होण्याची शक्‍यता त्यांनी सूचित केले.

भारतातील कंपन्यांचा नफा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या तुलनेत फारसा वाढताना दिसत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. याचा अर्थ कंपन्या फारशी गुंतवणूक किंवा विस्तारीकरण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येते असे त्यांनी सांगितले. बॅंकाचा अनुत्पादक मालमत्तेचा मुद्दा निकालात निघाल्याशिवाय कंपन्याची गुंतवणूक वाढणार नसल्याचे त्यांना वाटते. सरकारचे आणि बॅंकाचे ताळेबंद पाहता हा मुद्दा लवकर निकालात निघण्याची शक्‍यता कमी असल्याचे त्यांनी सूचीत केले. भांडवल बाजारासमोरील प्रश्‍नाबाबत बोलतांना त्यानी सांगितले की, आतापर्यंत म्युच्युअल फंडानी भारतातील भांडवल बजारात मोठी भूमिका अदा केली आहे.

मात्र त्यांच्याकडून आता गुंतवणूक मंदावली आहे. जर निर्देशांक आणखी कमी झाले तर म्युच्युअल फंडाची आणखी हाणी होऊ शकते. मात्र या फंडातील गुंतवणूक फक्त कमी झाली आहे. ती कोलमडलेली नाही. किंवा परत जाण्याची स्थिती नाही. यातून लवकर मार्ग काढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)