मोदी सरकार देशातील श्रीमंतांसाठी काम करत आहे – राहुल गांधी

मुंबई : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा भाजप सरकार, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकार देशातील श्रीमंतांसाठी काम करत आहे. गरिबांचा पैसा लुटून श्रीमंतांचे खिसे भरण्याचे काम करत आहे. त्यांची लाखो-कोट्यवधी रुपयांची कर्जे माफ केली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पेट्रोल दरवाढ, जीएसटी आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. देशातील काही मोजक्याच धनाढ्यांसाठी हे सरकार काम करत आहे. त्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले जात आहे, असे ते म्हणाले. मनमोहन सिंग सरकारच्या काळात पेट्रोलचे दर १४० डॉलर प्रति बॅरल होतं. ते आज ७० डॉलर प्रति बॅरल आहेत.

दर कमी होऊनही सर्वसामान्यांना त्याचा फायदा मिळत नाही. पेट्रोलचे दर दररोज वाढत आहेत. हा पैसा जातोय कुठे? मोदी सरकार गरिबांच्या खिशातून पैसे काढते आणि देशातील १५-२० श्रीमंतांचे खिसे भरतं, असा आरोपही त्यांनी केला. जीएसटीमध्ये पेट्रोल-डिझेलचा समावेश करण्याची आमची मागणी आहे. पण त्यात पंतप्रधान मोदींना काहीही रस नाही, असंही ते म्हणाले. देशातील विरोधी पक्ष हे पंतप्रधान मोदी, भाजप आणि संघाविरोधात एकवटले आहेत. राजकीय पक्षच नव्हे तर देशातील जनतेमध्येही सरकारविरोधी नाराजीची भावना आहे, असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)