मोदी सरकारविरोधात कॉंग्रेस हाती घेणार जनआंदोलन

भ्रष्टाचार, बॅंक घोटाळ्यांवरून करणार लक्ष्य
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारविरोधात आणखी आक्रमक होण्याचे संकेत कॉंग्रेसने दिले आहेत. भ्रष्टाचार, बॅंक घोटाळे, अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था आदी मुद्‌द्‌यांवरून सरकारविरोधात रान पेटवण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला आहे. त्यासाठी लवकरच जनआंदोलन हाती घेतले जाणार आहे.

कॉंग्रेस कार्यकारिणीची आज येथे बैठक झाली. त्यामध्ये जनआंदोलन छेडण्याचे निश्‍चित झाले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही नव्या कार्यकारिणीची दुसरी बैठक ठरली. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबरच ए.के.अँटनी, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, अशोक गेहलोत आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीचे कारण मात्र समजू शकले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, या बैठकीत संसदेत आणि संसदेबाहेरही भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावरून सरकारला घेरण्याचे ठरले. त्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या जनआंदोलनात राफेल करारावर भर दिला जाईल. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्‍सी याच्याविरोधात भारतीय यंत्रणांकडून कुठला प्रतिकूल शेरा देण्यात न आल्याने त्याला नागरिकत्व देण्यात आल्याचे अँटिग्वा सरकारने म्हटले आहे. त्यामुळे चोक्‍सीने देशाबाहेर पलायन करण्यात मोदी सरकारचा सहभाग असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. हा मुद्दाही जनआंदोलनावेळी उपस्थित केला जाईल.

दरम्यान, आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेवरून (एनआरसी) सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अशात एनआरसीची संकल्पना कॉंग्रेसचीच असल्याचा दावा पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी बैठकीनंतर बोलताना केला. केंद्रात कॉंग्रेसची सत्ता असताना 2005 ते 2013 या कालावधीत 82 हजार 728 बांगलादेशींना परत पाठवण्यात आले. तर मोदी सरकारने चार वर्षांत केवळ 1 हजार 822 परदेशींना परत पाठवल्याचेही त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)