मोदी सरकारविरोधात कॉंग्रेसही आणणार अविश्‍वास ठराव

नवी दिल्ली – तेलगू देसम पक्ष (टीडीपी) आणि वायएसआर कॉंग्रेसपाठोपाठ कॉंग्रेसनेही मोदी सरकारविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे मंगळवारी ठराव मांडतील, असे समजते. कॉंग्रेसने आपल्या सर्व खासदारांसाठी पक्षादेश (व्हिप) जारी केला असून त्यांना मंगळवारी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

अविश्‍वास ठरावाला पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशातून कॉंग्रेसकडून इतर विरोधी पक्षांशी संपर्क साधला जात आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. आंध्रप्रदेशातील सत्ताधारी टीडीपी आणि प्रमुख विरोधी पक्ष वायएसआर कॉंग्रेस यांनी याआधीच अविश्‍वास ठरावासाठीच्या नोटिसा दिल्या आहेत. मात्र, गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज मागील काही दिवसांपासून ठप्पच असल्याचे चित्र आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)