मोदी सरकारने सर्व मर्यादा ओलांडली : मनमोहनसिंग

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की त्यांनी देशाच्या हिताचे जे नाही ते सर्व काही केले आहे. त्यांनी सर्वच मर्यादा आता ओलांडल्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे. या सरकारच्या स्वैर काराभारामुळे देशातील लोकशाहीं संस्थाही आता धोक्‍यात आल्या असून धोक्‍यात आलेला देश वाचवण्यासाठी आता सर्व विरोधक एकत्र येत आहेत असे ते म्हणाले.

अन्य विरोधी पक्षांनीही आपसातील मतभेद विसरून देशच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्या शुक्रवारीच मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. सरकारकडून विविध विषयांवर जी आकडेवारी सादर केली जात आहे ती शंकास्पद असल्याचे त्यांनी त्यावेळी नमूद केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)