मोदी सरकारच्या विरोधात जनहित याचिका दाखल करा ! अण्णा हजारे आक्रमक

अण्णासाहेब हजारे यांचे कार्यकर्त्यांना निर्देश; 30 पासून उपोषण

राळेगणसिद्धी: मोदी सरकारला लोकपाल व लोकायुक्‍तच्या मुद्‌द्‌यावर घेरण्यासाठी आंदोलनासह प्रत्येक राज्यातून जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी आज कार्यकर्त्यांना दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येत्या 30 जानेवारीपासून हजारे उपोषण सुरू करणार आहे. त्या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी आज राळेगणसिद्धी येथे बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. हजारे म्हणाले, लोकपाल व लोकायुक्‍त कायदा दोन्ही सभागृहात पारित होऊन देखील सरकार लागू करत नाही. कारण सरकारला भिती आहे, जर लोकपाल लागू झाला तर पंतप्रधान यांच्यासहित सर्व मंत्रिमंडळ या कायद्यांतर्गत येतील. यांच्या विरोधात तक्रारी आल्या तर चौकशी होण्याची भीती मोदी सरकारला वाटत असल्याने हा कायदा लागू करत नाही. जर लोकपाल अस्तित्वात असता तर राफेल घोटाळाही झाला नसता. ज्याअर्थी मोदी सरकार हा कायदा लागू करत नाही त्याअर्थी ते लोकशाहीच्या दोन्ही सभागृहाचा व देशातील संवैधानिक संस्थचा अवमान करत सरकारची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असल्याची टिका हजारे यावेळी केली.

पंजाब येथील किसान सभेचे अध्यक्ष जगजित सिंह पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कॉंग्रेसने जे तीन राज्यात जी कर्जमाफी केली ती समाधानकारक असली तरी कर्जमाफी हे शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी समाधान नाही. एक कर्जमाफी झाली की शेतकरी दुसरे कर्ज घेतो,शेतकऱ्यांना जर खरच उन्नतीच्या मार्गाने न्यायचे असेल तर डॉ.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी या केंद्र सरकारने लागू केल्या पाहिजेत. मोदी सरकारने जी कर्जमाफी केली ती शेतकऱ्यांची कर्जमाफी नसुन उद्योगपतींची आहे. या बैठकीसाठी डॉ. अजित देशमुख, शाम असावा, अशोक अब्बन, तरूष उत्पल, सुशिल भट्ट, मनिष ब्रम्हभट्ट, भोपाल सिंग, राम नाईक, प्रविण भारती, एच. वाजपेयी, कर्नल नयन दिनेश, अक्षय कुमार, शिवकुमार शर्मा, जगजीतसिंग, शिवाजी खेडकर, सरपंच प्रभावती पठारे, गायत्री गाजरे, लाभेष औटी, सुरेश पठारे, सुनिल हजारे, राजाराम गाजरे, संजय पठाडे, अमोल झेंडे, अन्सार शेख यांच्यासह महाराष्ट्र व देशभरातून 500 हुन अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.


धरणे आंदोलन, उपोषणाचा निर्णय

30 जानेवारीपासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसणार आहेत. कार्यकर्ते आपापल्या जिल्ह्यात मोर्चा काढून धरणे आंदोलने 4 फेब्रुवारीपर्यंत करणार आहेत. आंदोलनाची दखल घेतली नाही तर 5 फेब्रुवारीपासून तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच उपोषणाचा बैठकीत निर्णय झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)