मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचा दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची घोषणा 

कॉंग्रेस कार्यकारणीतील संमत झाला ठराव 
सेवाग्राम: महाराष्ट्रातल्या वर्धा सेवाग्राम आश्रमातील महादेव भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या अ.भा. कॉंग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत मोदी सरकारच्या विरोधात दुसऱ्या स्वातंत्र लढ्याची घोषणा करण्यात आली आहे. मोदी सरकार हे द्वेष आणि हिंसाचारावरच आधारीत आहे. त्यामुळे हे सरकार सत्तेवरून घालवण्यासाठी ब्रिटीशांच्या विरोधात जसा स्वातंत्र्य लढा पुकारण्यात आला होता तितक्‍याच ताकदीचा लढा पुकारावा लागणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती निमीत्त ही विशेष बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. त्या याविषयीचा ठराव संमत करण्यात आला आहे.
कार्यकारणीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे प्रवक्ते रणपदीप सुर्जेवाला यांनी सांगितले की आजच्या कार्यकारीणीच्या बैठकीत दोन ठराव संमत करण्यात आले. महात्मा गांधी यांनी देशाला एक विशिष्ट विचार प्रक्रिया देऊन भारताच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे असे ते म्हणाले. लालबहादुर शास्त्रांनाही या बैठकीत अभिवादन करण्यात आले. त्यांनी दिलेली जयजवान जय किसान ही केवळ एक घोषणा नव्हती तर ती एक जीवन पद्धती आहे असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या हक्‍कासाठी कॉंग्रेसचा लढा सुरूच राहील असेही त्यांनी सांगितले. मोदी सरकारने देशात द्वेष, विभाजन, भय, धृव्रीकरण, विरोधी आवाज दाबूून टाकण्याची प्रृवत्ती जोपासली आहे त्याला विरोध म्हणून या सरकारच्या विरोधात हा लढा पुकारला जात आहे. भाषणासाठी गांधीजींचा वापर करणे सोपे असते पण त्यांच्या मार्गावरून चालणे तितकेच अवघड असते असे ते म्हणाले. मोदींच्या खोटेपणा आणि विश्‍वासघाताच्या राजकारणाच्याही विरोधात लढण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
दिल्लीच्या परिसरात मोर्चाने आलेल्या शेतकऱ्यांवर आज जो लाठी हल्ला आणि त्यांच्या विरोधात अश्रुधुराचा वापर करण्यात आला त्यावरून सरकारवर जोरदार टीका करताना सुर्जेवाला म्हणाले की सत्तेची धुंद चढलेल्या शेतकऱ्यांनी न्याय मागायला आलेल्या शेतकऱ्यांवर आसुड ओढले आहेत. आम्ही सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना न्याय देऊ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारीणीची बैठक झाली. त्याला कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह अन्य सर्व कार्यकारीणी सदस्य व नेते उपस्थित होते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)