मोदी सरकारच्या विरोधातील अविश्‍वास ठरावासाठी अन्य पक्षांचे पाठबळ मिळवा

चंद्राबाबुंचे पक्षाच्या खासदारांना आवाहन
अमरावती – तेलगु देसम पक्षाने मोदी सरकारच्या विरोधात अविश्‍वास ठराव का आणला याची माहिती संसदेतील सर्वच पक्षांना देऊन त्यांचा या ठरावासाठी पाठिंबा मिळवण्याचा कसोशीचा प्रयत्न करा असे आवाहन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे. टेलिकॉन्फरन्सिंग द्वारे त्यांनी आज पक्षाच्या खासदारांना संबोधीत केले. ते म्हणाले की मोदी सरकारेन आंध्रप्रदेशावर सरळसरळ अन्याय केला असून केंद्राने राज्याच्या विभागणीच्यावेळी दिलेले कोणतेही आश्‍वासन पाळलेले नाही. ही सारी कल्पना अन्य पक्षाच्या खासदारांना द्या अशी सुचनाही त्यांनी केली.

आपल्या पक्षाच्या अविश्‍वास ठरावावर संसदेत चर्चा का करू दिली जात नाहीं असा सवालही त्यांनी सरकारला केला. या बाबतीत संसदेत जागरूक राहण्याची सुचनाही त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांना दिली. संसदेत गोंधळाचे वातावरण आहे त्यामुळे हा विषय चर्चेला घेता येत नसल्याची भूमिका सभापती सुमित्रा महाजन यांनी घेतली आहे. त्याविषयीही त्यांनी शंका उपस्थित केली. ते म्हणाले की सरकारलाच या विषयावर चर्चा नको आहे म्हणून ते गोंधळाचे कारण पुढे करीत आहेत. पण अन्य पक्षांना मदतीला घेऊन यावर चर्चा करण्यास सरकारला भाग पाडा अशी सुचना त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की या ठरावावर आम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमुल कॉंग्रेस, आम आदमी पक्ष, राजद, आणि कम्युनिस्ट पक्षांनी पाठिंबा द्यायचे कबुल केले आहे अशी माहितीही नायडू यांनी यावेळी दिली. तसेच त्यांनी आज या विषयावर पक्षीय स्थितीचा आढावाही घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)