मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

वाल्हे- पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात वाल्हेमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला.
इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधी पक्षांकडून भारत बंदची हाक देण्यात आली होती. जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामदास भुजबळ, कॉंग्रेसचे गोरख मेमाणे, किरण कुमठेकर व तुषार भुजबळ आदी उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)