मोदी सरकारच्या धोरणांवर बॅंक, विमा कर्मचारी नाराज

मुंबईत आज धरणे आंदोलन
मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणि विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोदी सरकारच्या विविध धोरणांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्या धोरणांच्या निषेधार्थ उद्या बॅंक आणि विमा कर्मचारी संघटना उद्या (शनिवार) येथील आझाद मैदानावर धरणे धरणार आहेत.

को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ बॅंक, इन्शुरन्स अँड फायनान्शियल सेक्‍टर युनियन्सच्या (सीसीबीआयएफयू) छत्राखाली एकवटलेल्या बॅंक आणि विमा कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉई असोसिएशन, ऑल इंडिया बॅंक्‍स ऑफिसर्स असोसिएशन, ऑल इंडिया एलआयसी एम्प्लॉईज फेडरेशन, एम्प्लॉई युनियन्स फ्रॉम जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आदी संघटना आंदोलनात सहभागी होणार आहेत.

बॅंकांचे खासगीकरण, विमा क्षेत्रात थेट परकी गुंतवणुकीला परवानगी, नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग आदी सरकारी धोरणांना या संघटनांनी विरोध दर्शवला आहे. वेतन सुधारणा प्रक्रियेला गती देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. केंद्रातील आताचे सरकार जनता आणि कर्मचारीविरोधी धोरणे राबवत आहे. त्या धोरणांच्या विरोधात लढा देण्यासाठी आर्थिक क्षेत्रामधील कर्मचारी संघटना एकत्र आल्या आहेत, असे सीसीबीआयएफयूने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)