मोदी सरकारच्या काळातच अयोध्येत राम मंदिर निर्माण करणार – स्वरुपानंद सरस्वती

भोपाळ : केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आहे, त्यामुळे याच काळात सर्व धर्माचार्य आणि हिंदू समाजाचे लोक अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिराची निर्मिती करतील, असे वक्तव्य शारदा पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे.

निवडणूक घोषणापत्रात देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करणे मोदी सरकारचे कर्तव्य आहे. भाजपने राम मंदिराचा मुद्दा घोषणापत्रात समाविष्ट केला होता. याच्याच बळावर केंद्रात भाजपचे सरकार स्थापन होऊ शकले आहे. पंतप्रधानपदावर असताना नरेंद्र मोदी मंदिर उभारणीतील अडचणी दूर करतील असा आम्हाला विश्वास देखील असल्याचे सरस्वती यांनी म्हटले आहे. मोदी वगळता केंद्रात दुसऱया कोणाचे सरकार स्थापन झाले, तर आम्ही धर्माचार्य, हिंदू समाज आणि भारताच्या जनतेला मंदिर निर्माण करण्याची मागणी करण्याचा हक्क राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले. राम मंदिर समवेत अन्य हिंदू हितांच्या मुद्यांवरून निवडणूक लढवणारा भाजप एकमात्र पक्ष असल्याचा दावा स्वरुपानंद यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)