मोदी सरकारच्या कामामुळे अर्थव्यवस्था उत्तम – राजीव कुमार 

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकारची गेल्या चार वर्षांतील विकास दर, चलनवाढ आणि आर्थिक तूट यासह सकल राष्ट्रीय उत्पादन आदी स्थूल आर्थिक निकषांतील कामगिरी उत्तम असल्याचा दावा नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजीव कुमार म्हणाले की, संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या कार्यकाळात निर्णयप्रक्रिया थंडावली होती व तो गतिशून्य अवस्थेत गेल्यानंतर मोदी सरकारने सगळ्या आघाड्यांवर चांगली कामगिरी केली आहे. याचे परिणमा दिसून येत आहेत.

26 मे, 2014 रोजी मोदी पंतप्रधान बनले होते. 2014 मध्ये अर्थव्यवस्था घसरली होती, बॅंकांचे वसूल न होणारे कर्ज (एनपीए) आधीच वाढलेले होते. त्यात भर पडली, ती धोरण लकव्याची. सरकारला तेव्हा मिळालेला हा आर्थिक वारसा होता. आज आम्ही ज्या स्थानावर आहोत, तेथे आम्ही या क्षणाला पोहोचलो आहोत, हे आश्‍चर्यजनक आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी सुधारण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)