मोदी सरकारची चार वर्षे निराशाजनक – मायावती

लखनौ – नरेंद्र मोदी सरकारचा चार वर्षांचा कारभार पुर्ण निराशाजनक आहे अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की एनडीएतील राजकीय पक्ष एकेककरून त्यांना सोडून जात आहेत त्यातून त्यांच्या विषयीची निराशा स्पष्ट दिसून आली आहे. या राजवटीत गरीब, कामगार, सामान्य माणूस, महिला या घटकांचे शोषणच झाले आहे. चोरी और सीना जोरी असे या सरकारचा स्वरूप आहे असे त्यांनी म्हटले आहे. भाजप आणि पंतप्रधानांनी एकही आश्‍वासन पाळलेले नाही. त्यामुळे त्यांच्या सरकारने विश्‍वास गमावला असून सरकारची परिणामकारकता गमावली गेली आहे अशी टिपण्णीही मायावती यांनी केली आहे.

आज भाजपचेच लोक त्यांचे ऐकेनासे झाले आहेत, त्यामुळे भाजपचे आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे असेही त्यांनी म्हटले आहे. हे सरकार भांडवलशाही पुढे पुर्ण झुकले आहे त्यामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सर्वत्र भीती आणि नैराश्‍य पसरले असून लोकांना आता आपले बॅंकेतील पैसे सुरक्षित राहतील की नाहीं याचीच िंचंता लागून राहीली आहे.

समाजाच्या सर्वच घटकांमध्ये अराजकाची स्थिती निर्माण झाली असून भाजपची राजवट म्हणजे जंगल राज असल्याची त्यांची खात्री पटली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. देशातील उन्नाओ आणि कठुआ सारखी बलात्काराची प्रकरणे त्यांनी दडपून टाकली आहेत त्यातून या पक्षाचा खरा चेहरा लोकांपुढे आला आहे असा आरोपही मायावती यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)