मोदी सरकारचा विकासाचा नव्हे भूलथापांचा अजेंडा- पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण : प्रथमच कृषी अर्थव्यवस्थेचा विकास दर घसरला 

लातूर: केंद्रातील मोदी सरकारचा चार वर्षातील कारभार पाहता त्यांचा विकासाचा नव्हे, तर केवळ भूलथापा देण्याचाच अजेंडा असल्याचे दिसून येते. निवडणूक येताच राम मंदिराचा मुद्दा पुन्हा समोर आणतील. इतकेच नव्हे तर समाजात हल्ले घडवून आणतील, असा आरोपही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लातूर येथील कॉंग्रेस भवन येथे आयोजीत पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदींच्या काळात पहिल्यांदा कृषी अर्थव्यवस्थेचा विकास दर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. मोदींची मानसिकता ही व्यापाऱ्यांची आहे. त्यामुळे ते ग्राहकांचे हित लक्षात घेत आहेत. देशातील शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात आहे.

केंद्र सरकार सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे. एक वर्षात 18 टक्‍क्‍यांनी रुपया घसरला आहे. पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून केंद्र सरकारने कराच्या माध्यमातून सामान्यांच्या खिशातील 21 लाख कोटी रुपये काढले आहेत. देशासमोर गंभीर आर्थिक संकट आहे. येत्या निवडणुकीत ते जाहिरनामा काढण्याची हिंमत करणार नाहीत, असे चव्हाण म्हणाले.

राफेलमधील भ्रष्टाचाराचे वातावरण तापू लागल्याने सीबीआयचे नाट्य घडवून आणण्यात आले आहे. सीबीआयचे संचालक व विशेष संचालकात सुरु असलेला प्रकारात मोदींनी कायद्याला मोडून हस्तक्षेप केला. त्यांना कशाची भिती वाटत आहे. राफेलमधील भ्रष्टाचार हा निवडणूकीचा मुद्दा असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आघाडी आणि महाआघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान कोण होणार हा आमच्या समोर प्रश्न नाही. विरोधकांच्या जागा जास्त आल्यानंतर सर्व बसून पंतप्रधान कोण होणार याचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)