मोदी सरकारकडून गरिबांसाठीच जास्तीत जास्त योजना

मिरजगाव – मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर तीन वर्षांत गोरगरीब, दलित व सर्वच स्तरातील नागरिकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केले. मिरजगाव (ता. कर्जत) येथे माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या वतीने आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, उपसभापती प्रशांत बुध्दीवंत, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, उपसरपंच अमृत लिंगडे, तहसीलदार किरण सावंत, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे भंडारी, हरिदास केदारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खा. गांधी यांनी मोदी सरकारने केलेल्या योजनांचा आढावा घेऊन जनधन योजना, वन रॅंक वन पेन्शन, नोटाबंदी, गरिबांना मोफत गॅस, वीजजोडणी, रस्ते विकास, आदिवासींना जमीन वाटप, शेतकऱ्यांचे अनुदान थेट खात्यात जमा, बेरोजगारांना विनातारण मुद्रा लोन यासारख्या असंख्य योजना सुरू करून गोरगरिबांना व शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले असल्याचे सांगितले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी जलयुक्‍त शिवार योजना, कृषी विभागाच्या योजना यांची माहिती दिली. तहसीलदार किरण सावंत यांनी महसूल विभागाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी आरोग्य, शिक्षण व इतर खात्यांच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावलेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)