मोदी-शहांचा संविधानावरच हल्ला : जिग्नेश मेवानी 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा ही जोडगळी भारतीय संविधानावर हल्ला करत आहे. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय, सीबीआय यासारख्या महत्वाच्या संस्थांवर वर्चस्व आणत आहे. त्यामुळे संविधान वाचवण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, असे म्हणत आंबेडकरवादी नेते जिग्नेश मेवानी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

संघाला लोकशाही संपावायची – कन्हैया कुमार 
अयोध्या हा आस्थेचा विषय आहे, यावर राजकारण करायला नको. मंदिर बांधले का? असा प्रश्न विचारु नका तर हॉस्पिटल, शाळा बांधल्या का? असा प्रश्न सरकारला विचारा. मंदिर हा प्रश्न नाहीच देशासमोर जे मुख्य प्रश्न आहेत, ते दुर्लक्षित केले जात आहे, असे कन्हैया कुमार म्हणाला. धर्म सकंटात नाही, ना मुस्लिम, ना हिंदू. कारण नसताना वातावरण तापवल जात आहे. संघाला लोकशाही संपावायची आहे, म्हणून हे सगळ सुरु असल्याचे कन्हैया कुमार म्हणाला. 

देशात वाढत्या फॅसिझमच्या विरोधात युनायटेड यूथ फ्रंटच्या माध्यमातून देशातील राजकीय प्रमुख युवा संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांनी आज राजगृह ते चैत्यभूमी अशी “संविधान बचाओ” रॅली काढली. या संविधान बचाओ रॅलीत आमदार अजित पवारांसह गुजरातमधील पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दीक पटेल, जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार, तृप्ती देसाई, तसेच महाराष्ट्रातील विविध पक्षाचे नेते सहभागी झाले आहेत.

-Ads-

मंदिर महत्वाचे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित हार्दिक पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली. पटेल म्हणाले, महाराष्ट्रात शेतकरी सरण रचून आत्महत्या करत आहे. मात्र उद्धव ठाकरे मंदिराचा मुद्दा घेऊन अयोध्या दौरा करत आहेत. अयोध्येत 144 कलम लागू करण्यात आले आहे. मात्र 144 कलम लागू करुन सुद्धा शिवसेना, विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसचे कार्यकर्ते इतक्‍या मोठ्या प्रमाणात आले कसे? आम्ही आंदोलन केले की मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात येते, अशा शब्दांत त्यांनी पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)