मोदी व पलानी स्वामींवर टीका करणारी गाणी गाणाऱ्या गायकाला अटक

चेन्नाई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडुचे मुख्यमंत्री पलानी स्वामी यांच्यावर टीका करणारी गाणी गायल्याबद्दल तामिळी लोकगीत गायक कोवन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या गायनाचा एक व्हिडीओ युट्युबवर प्रकाशित झाली असून त्यात त्यांनी पलानी स्वामी आणि मोदी यांच्या बरोबरच श्री राम दास मिशन युनिव्हर्सिटीतर्फे काढण्यात आलेल्या रथयात्रेवरही टिका करण्यात आली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ आक्षेपार्ह असल्याची तक्रार भाजपचे युवक विभागाचे पदाधिकारी एन गौतम यांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्यानुसार कोवन यांना अटक केली आहे.

या व्हिडीओमध्ये, त्यांनी कावेरी प्रश्‍नवरूनही मोदींना लक्ष्य केले आहे. या गाण्यातील तपशील आक्षेपार्ह असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याच गायकाला 2015 मध्ये, तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर टीका करणारे गाणे प्रकाशित केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)