मोदी, राहुल गांधी यांनी घेतले करूणानिधींचे अत्यंदर्शन

चेन्नाई – पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चेन्नईत जाऊन करूणानिधी यांचे अत्यंदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदी हवाईदलाच्या विशेष विमानाने चेन्नाईत आले.

राजाजी हॉल मध्ये जाऊन त्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी करूणनिधी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. द्रमुक पक्षाचे हंगामीप्रमुख एम. के स्टॅलिन यांचीही भेट घेऊन मोदींनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी मोदी यांच्या समवेत राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, तसेच प्रदेश भाजपचे अन्य नेते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

करूणानिधी यांच्या कन्या कनिमोळी व स्टॅलिन यांच्याशीही मोदींनी काही मिनीटे स्वतंत्र चर्चा केली. करूणानिधी यांना श्रद्धांजली वाहताना मोदींनी म्हटले आहे की जनमानसात खोल मुळे रूजलेले ते एक जननायक होते व त्यांनी प्रादेशिक अस्मिता जपतानाच देशाच्या विकासातही मोठे योगदान दिले आहे. ते चतुरस्त्र विचारवंतही होते असेही मोदींनी नमूद केले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही त्यांच्या अंत्यविधीसाठी चेन्नाईत आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)