मोदी भक्तांनो तुमच्या नेत्याला रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास सांगा – राहुल गांधी

नवी दिल्ली – सातत्याने भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा भाजप नेते आणि पंतप्रधान मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.

यावेळी त्यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत, मोदी भक्तांनो तुमच्या नेत्यांना केवळ घोषणा देण्यापेक्षा  मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सांगा, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. या व्हिडिओमध्ये हार्डवेअर उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेली चीनमधील सिलिकॉन व्हॅलीची बाजारपेठ दाखवण्यात आली आहे. येथे नव्या उद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी कशाप्रकारे मदत केली जाते. तसेच अगदी छोट्यात छोट्या तंत्रज्ञानाची दखल देखील त्वरित घेतली जात असल्याचे दाखवले आहे. हा व्हिडीओ शेअर करून राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला.

-Ads-

ते म्हणाले, यामुळेच चीन भारताच्या कितीतरी पटीने पुढे आहे. मात्र भारतात सत्ताधारी नुसत्याच पोकळ घोषणा देत असल्याने देशाचा विकास झाला नाही. इथल्या तरुणाईला जर रोजगारासाठी झगडावे लागत असेल तर हे देशाचं दुर्दैव आहे. तेव्हा मोदी भक्तांनो तुमच्या नेत्याला जाऊन सांगा की पोकळ घोषणा देण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर द्या, अशा शब्दात राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)