मोदी बिग बॉस बनून तुमच्यावर लक्ष ठेवित आहेत – राहुल गांधी

नमो ऍप मधून गुप्तपणे चालते रेकॉर्डिंग – राहुल गांधी यांचा नवा आरोप
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो ऍप मधूनच डाटा लीक केला जात असून तो अमेरिकेतील त्यांच्या मित्र कंपनीला पुरवला जात आहे असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केला होता. आज पुन्हा त्यावरून मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की मोदींच्या नमो ऍप वरून नागरीकांचे गुप्तपणे ऑडिओ आणि व्हीडिओ रेकॉर्डिंगही केले जात असून हे ऍप वापरणाऱ्याचे लोकेशनही जीपीएस सिस्टीमचा वापर करून शोधले जात आहे. एक प्रकारे मोदी बिग बॉस बनून तुमच्यावर बारीक लक्ष ठेवीत आहेत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

डाटा चोरीचा हा प्रयोग मोदी आता आपल्या मुलांवरही करीत असून त्यांनी एनसीसीच्या 13 लाख विद्यार्थ्यांना नमो ऍप डाऊन लोड करण्याची सक्ती करण्यात आली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. तथापी भाजपने त्यांचा हा आरोप फेटाळला असून राहुलू गांधी चुकीची माहिती देत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या दाव्यावर पलटवार करताना भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे की कॉंग्रेसच्याच ऍपवरून नागरीकांचा डाटा त्यांच्या सिंगापुरातील मित्रांना दिला जात आहे. राहुल गांधी यांनी ज्या शैलीत मोदींच्या विरोधात ट्विट करून काल हा आरोप केला होता त्याच शैलीत मालवीय यांनी त्यांना प्रत्यत्तुर दिले आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, नमस्कार माझे नाव राहुल गांधी आहे.

मी देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे. आणि तुम्ही जेव्हा आमच्या ऑफिशियल ऍपवर साईन ईन करता तेव्हा मी तुमचा सारा डाटा माझ्या सिंगापुरातील मित्रांना देतो असे त्यांनी उपरोधिकपणे नमूद केले आहे. कॉंग्रेसने केलेल्या आरोपाचा खुलासा करताना भाजपने काल म्हटले होते आमच्या ऍपवरील डाटा दुसऱ्यांना दिला जातो हे खरे असले तरी त्याचा उपयोग केवळ विश्‍लेषणासाठी केला जात आहे. या विषयावरून दोन्ही पक्षांमध्ये आज दिवसभर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच राहिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)