मोदी फक्त हवेत घोषणा करतात- जयंत पाटील

कोल्हापूर: भुदगरड तालुक्यातील मुदोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवर्तन यात्रेची सभा आज झाली. सभेला स्थानिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

राज्यात १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात इतक्या घोषणा केल्या जातील की, आपल्याला वाटेल आतापर्यंत मोदींनीच आपल्याला सर्व काही दिले आहे. पण लक्षात ठेवा मोदी जे बोलतात, ते कधीच करत नाहीत. मोदी फक्त हवेत घोषणा करतात, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सभेत व्यक्त केले.

-Ads-

पाच राज्यांचे निकाल पाहता भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे भाजपा निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करू शकते. म्हणूनच निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्यात आले. आमचा आरक्षणाला विरोध नाही, पण भाजपा फसवणूक करते आहे, असा आरोपही त्यांनी केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)