नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाच दिवसीय परदेश दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्यात ते स्वीडन आणि ब्रिटन या देशांना भेटी देणार आहेत.
दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये दाखल होतील. ते स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. स्वीडनमध्ये मोदी एका परिषदेतही सहभागी होतील. त्यानंतर ते ब्रिटनला भेट देणार आहेत. तिथे ते ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. याशिवाय, राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीतही मोदी सहभागी होणार आहेत.
ब्रिटन आणि स्वीडन या देशांबरोबरचे संबंध आणखी मजबूत होण्याच्या दृष्टीने मोदी यांच्या दौऱ्याला महत्व आहे. व्यापार, गुंतवणूक आणि स्वच्छ ऊर्जा हे मुद्दे या दौऱ्याच्या प्राधान्यक्रमावर असतील. दरम्यान, दोन्ही देशांचा दौरा आटोपून मोदी 20 एप्रिलला बर्लिनमध्ये काही वेळ थांबण्याची शक्यता आहे. त्यावेळी ते जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याशी चर्चा करतील, असे समजते.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा