मोदी परीक्षा सोडून लव्हली युनिव्हर्सिटीत पळून गेले – राहुल गांधी 

नवी दिल्ली –  राफेल प्रकरणावरून लोकसभेत घमासान चालू असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ 20 मिनिटे चर्चा करावी, असे आव्हान दिले होते. यानंतर राहुल गांधींनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान लोकसभा आणि आपली राफेल परीक्षा सोडून लव्हली युनिव्हर्सिटीत पळून गेले. दरम्यान, नरेंद्र मोदी आज पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीत एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

राहुल गांधी म्हणाले कि, पंतप्रधान लोकसभा आणि आपली राफेल परीक्षा सोडून पळून गेले. लव्हली युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी पूर्ण सन्मानाने मोदींना मी ट्विट केलेले ते चार प्रश्न विचारावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

दरम्यान, याआधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना चार प्रश्न ट्विट करत विचारले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)