‘मोदी पंतप्रधान बनून १६५४ दिवस, एकदा तरी पत्रकार परिषद घ्या’

हैद्राबाद – राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा बुधवारी थंडावल्या आहेत. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत पत्रकार परिषदेचे आव्हानच दिले. राहुल गांधी यांनी म्हंटले कि, पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळून १६५४ दिवस झाले. आता पंतप्रधान मोदींनी एकदा तरी पत्रकार परिषदेच्या प्रश्नांच्या भडिमाराचा आनंद घेतला पाहिजे, असे ट्विट त्यांनी  केले आहे.

राहुल गांधी यांनी हैद्राबादमधील पत्रकार परिषद झाल्यानंतर आपले काही फोटो ट्विटरवर शेअर करत म्हणाले कि, प्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार पूर्ण झाला आहे. मी आशा करतो कि, पंतप्रधान म्हणून पार्ट टाइम जॉबसाठी काही वेळ तुम्ही काढाल. तुम्हाला पंतप्रधान बनून १६५४ दिवस झाले. तरीही एकही पत्रकार परिषद घेतली नाही. हैद्राबादमधील पत्रकार परिषदेचे काही फोटो शेअर करत आहे. एक दिवस प्रयत्न करा प्रश्नांच्या भडिमाराचा सामना करणे मजेशीर असते, असे त्यांनी म्हंटले आहे.

-Ads-

दरम्यान, राजस्थान आणि तेलंगणामध्ये ७ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)