मोदी टीम लीडर नाहीत; जनतेची निराशा : मेघनाद देसाई 

एकेकाळचे प्रशंसक बनले टीकाकार

मुंबई – एकेकाळचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसक असलेले ब्रिटीश राजकारणी आणि अर्थतज्ञ मेघनाद देसाई आता त्यांचे टीकाकार बनले आहेत. त्यातून मोदी चांगले राजकारणी आणि लोकनेते असले; तरी टीम लीडर नाहीत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत लंडनस्थित देसाई यांनी मोदींविषयी परखड भूमिका मांडली. मजबूत मंत्रिमंडळाच्या मदतीने नव्हे तर काही नोकरशहांच्या सहाय्याने संपूर्ण देश चालवला जाऊ शकतो, असा मोदींचा समज चुकीचा ठरला. परिणामी जनता निराश झाली आहे. अजूनपर्यंत चांगले दिवस आले नाहीत, अशी जनतेची भावना बनल्याचे सांगत त्यांनी जनता मोदींना पुन्हा बहुमत देणार नाही, असे भाकीत केले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कुठल्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही. त्यामुळे एनडीए किंवा यूपीए असे आघाडी सरकार पाहण्यासाठी तयार रहावे लागेल. आघाडीच्या अंमलामुळे सुरळितपणे सरकार चालवणे अवघड जाईल, असे त्यांनी म्हटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदींना चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी मिळाली होती. मात्र, सांघिक प्रयत्नांच्या अभावामुळे ते साधले नाही, अशा आशयाचे सूतोवाच देसाई यांनी केले. अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा अपवाद वगळता मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना पूर्वानुभव नाही. त्याउलट, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या राजवटीतील प्रणव मुखर्जी, शरद पवार आणि पी.चिदंबरम्‌ यांच्यासारख्या किमान सहा मंत्र्यांमध्ये पंतप्रधानपद भुषवण्याची पात्रता होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतीय रिझर्व्ह बॅंकेशी (आरबीआय) संबंधित घडामोडींवरून देसाई यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. एकापाठोपाठ दोन गव्हर्नर गमावणे चांगले नाही. राजकीय हेतूंनी आरबीआयचे कामकाज चालवले जाऊ नये, असे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

1 COMMENT

  1. मेघनाद देसाई बरेच दिवसांनी बोलत आहेत. सध्या त्यांना आपल्या कडे कोणी विचारात नाही. अगदी अर्णव गोस्वामीय सुद्धा. त्याचे हे नैराश्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)