मोदी-केजरीवाल ऐकत नाहीत म्हणून रेल्वे प्रवाशांचे ट्रम्प यांना गाऱ्हाणे 

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेसंबंधीची एक तक्रार सरळ डोनॉल्ड ट्रम्प यांच्याकडे गेली आहे. चेतक एक्‍स्प्रेस ट्रेन पालम स्टेशनवर थांबावी यासाठी प्रवासी संघटनेने अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनाच गाऱ्हाणे घातले आहे.  दिल्लीच्या सराय रोहिल्ला रेल्वे स्टेशनवरून राजस्थानमधील उदयपूरला दररोज चेतक एक्‍स्प्रेस ही ट्रेन जाते. चेतक एक्‍स्प्रेसला पालम स्टेशनवर स्टॉप नाही. दिल्ली कॅंट.

स्टेशननंतर ती एकदम गुरुग्रामला थांबते. ती पालम स्टेशनवर दोन मिनिटे थांबावी अशी प्रवाशांची अनेक वर्षे मागणी आहे. रेल्वे मंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री, पंतप्रधान या साऱ्यांना अनेक वेळा विनंती अर्ज करून झालेले आहेत. मात्र त्यांचा काहीही उपयोग न झाल्याने प्रवासी संघाने ट्विट करून थेट डोनॉल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत आपले गाऱ्हाणे पोहचवले आहे.

-Ads-

पालम रेल्वे स्टेशनला लागून अनेक विधानसभा मतदार संघ आहेत. द्वारकेसारखा घन लोकवस्ती असलेला इलाखा आहे. काही लाख वस्ती असलेल्या या भागासाठी चेतक एक्‍स्प्रेस पालम थांबावी अशी मागणी आहे. राजस्थानमधील खाटू श्‍याम धाम या धार्मिक स्थळाला भेट देणाऱ्या श्रद्धाळूंचीही हीच मागणी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
28 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
2 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
5 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)