मोदी आणि शहांसाठी मरायलाही तयार

राहुल गांधींचे समर्थन केल्यामुळे गोत्यात आले तरूण विजय


सहायकाची केली हकालपट्टी

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तरूण विजय यांच्या ट्‌विटर अकौंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत राहुल गांधी यांचे कौतुक करणारे संदेश प्रसारीत झाल्यानंतर मोठीच खळबळ उडाली होती. पण हा प्रकार खोडसाळपणातून झाला असल्याचा दावा तरूण विजय यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की हा प्रकार उघडकीला आल्यानंतर आपले ट्‌विटर अकौंट हॅंडल करणाऱ्या सहायकाची आपण हकालपट्टी केली असून आपले ट्‌विटर अकौंटही आपण बंद केले आहे असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रारही दिली आहे.

या प्रकाराविषयी केलेल्या खुलाशात आपण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठीच जगत असून त्यांच्यासाठी मरायलाही आपण तयार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. मोदी आणि शहा हे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी दीनदयाळ उपाध्याय आणि शामाप्रसाद मुखर्जी आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

रात्री दहा नंतर हा सारा प्रकार घडला. त्यात राहुल गांधी यांच्या कैलास मानससरोवर यात्रेचे जोरदार समर्थन करणारे संदेश प्रसारीत केले गेले. त्यांच्या या यात्रेला आक्षेप घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, राहुूल गांधी हे शिवभक्त आहेत आणि ते आणि शिव यांच्यातील ते नाते आहे. त्यात चूक काहीच नाही. असे या पोस्टवर नमूद करून मोदी यांच्यावर टीका करणाऱ्याही काही पोस्ट यात टाकण्यात आल्या होत्या.

त्या सर्व पोस्ट त्यांनी काढून टाकल्या असून त्यांनी आज सकाळी मोदींचे समर्थन करणाऱ्या काही पोस्ट मुद्दामहून आपल्या अकौंटवर प्रसारीत करून सारवासारव केली आहे. आपल्या अकौंटचा पासवर्ड चोरी करून आपल्या विरोधात हा कट करण्यात आला असल्याचेही तरूण विजय यांनी म्हटले आहे. तरूण विजय हे संघातर्फे चालवल्या जाणाऱ्या पांचजन्य या नियतकालिकाचे माजी संपादक आहेत आणि ते माजी खासदारही आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)