मोदी आणि फडणवीस सरकारचे दुष्काळ मोजण्याचे गणित आर्यभटांनाही समजणार नाही- धनंजय मुंडे

मुंबई: “नरेंद्र मोदी काय देवेंद्र फडणवीस काय, यांच्या सरकारचे दुष्काळ मोजण्याचे गणित आर्यभट्ट यांनाही समजणार नाही. जानेवारी 2018 पासून मी 2016 चे दुष्काळाचे निकष बदलण्याची मागणी करतो आहे. सरकारने त्याची दखल घेतली असती तर लाखो शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती”, असे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

मोदींच्या सॅटेलाईट मुळे काही तालुके दुष्काळातुन वगळले, असे वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षांनी चांगलाच समाचार घेतला आहे. लोणीकर यांचे वक्तव्य अतिशय धक्कादायक व तितकेच खरे असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. मोदी काय किंवा फडणवीस काय, यांची दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत शेतकरी विरोधी व विमा कंपन्यांच्या फायद्याची असल्यानेच लाखो शेतकरी वंचित असल्याचे मुंडे म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)