मोदी आणि पेन्स यांच्यात चर्चा 

सिंगापूर  – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्यात आज परस्पर हिताच्या द्विपक्षीय आणि जागतिक मुद्दयांवर चर्चा झाली. संरक्षण, व्यापारी सहकार्य, दहशतवादाला विरोध करण्याचे मार्ग आणि मुक्‍त आणि खुल्या इंडो पॅसिफिक भूभागागाची आवश्‍यकता या प्रमुख विषयांचा त्यामध्ये समावेश होता. जागतिक आणि प्रादेशिक विषयांच्या सर्व आयामांवर दोन्ही नेत्यांमध्ये विधायक चर्चा झाली. पूर्व आशियायी परिषदेच्या निमित्ताने मोदी सिंगापूरमध्ये गेले आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी सांगितले.

या चर्चेतून भारत प्रशांत भूभागाच्या खुलेपणाबाबत भूमिकांचे आदानप्रदान. तसेच संरक्षण आणि दहशतवादाविरोधातील सहकार्य सक्षम करण्याबाबतची कटिबद्धताही अधोरेखित केली गेल्याचे पेन्स यांनी बैठकीनम्तर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

-Ads-

संरक्षण साधन सामुग्रीच्या निर्यातीसाठी भारत एक उत्तम केंद्र बनू शकतो. यामुळे यासाठीचे उद्योग भारतात स्थापन करण्यास अमेरिकेला मोठी संधी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी या भेटीदरम्यान केले. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताची अर्थपूर्ण भूमिका आहे. राजकीय आणि अर्थिक बाबींशी संबंधित मुद्दयांसाठी भारतासह काम करण्यास अमेरिका इच्छुक असल्याचे पेन्स यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)