मोदी असत्यवचनी पंतप्रधान : मनमोहनसिंग 

साडे चार वर्षात त्यांनी लोकांचा विश्‍वास पुर्ण गमावला 

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी हे असत्यवचनी पंतप्रधान आहेत. गेल्या साडे चार वर्षाच्या काळात त्यांनी लोकांचा विश्‍वास पुर्ण गमावला असून त्यांची राजवट देश हिताची नाही अशा कडक शब्दात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर निशाणा साधला आहे. खासदार शशी थरूर यांनी मोदींच्या खोटेपणावर एक पुस्तक लिहीले असून त्याचे प्रकाशन आज मनमोहनसिंग यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी मोदींच्या कारभारावर चौफेर टीका केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली. लोक आता भयभीत झालेले दिसत आहेत. देशात रोजगार निर्मीती थांबली आहे, देशाच्या सीमा पुर्ण असुरक्षित बनल्या आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले आहे, काश्‍मीरात अस्थैर्य निर्माण झाले आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की बेटी बचाव, स्वच्छ भारत, स्कील डेव्हलपमेंट, मेक ईन इंडिया या चांगल्या योजना असूनही त्याच्या अंमलबजावणीत मात्र सरकारला साफ अपयश आले आहे. मोदींच्या अपयशी राज्यकारभाराचेच हे लक्षण आहे. धर्मनिरपेक्ष, मुक्त आणि समानतेची संधी असलेल्या देशाची उभारणी आपल्या पुर्वाश्रमीच्या नेत्यांनी गेल्या साडे सहा दशकात केली होती. पण आज मोदींच्या नेतृत्वात जो भारत दिसतो आहे तशा भारताची त्यांनी कधीच अपेक्षा केली नव्हती असे ते म्हणाले.

आर्थिक आघाडीवर मोदींना काहीही भरीव करता आलेले नाही. विदेशातील काळा पैसा परत आणण्याचे त्यांचे सारे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यांनी जीएसटीची अत्यंत घिसाडघाईने अंमलबजावणी करून त्याचा विचका केला. इंधनाच्या किंमतींनी ऐतिहासिक उंची त्यांच्या काळात गाठली गेली. त्यांची सत्ता देशाच्या हिताची नाही असेही मनमोहनसिंग यांनी नमूद केले. त्यांनी केवळ मार्केटिंगचेतंत्र वापरून लोकांना पोकळ आश्‍वासनांमध्येच झुलवत ठेवले. देशाच्या प्रत्यक्ष वस्तुस्थिती मध्ये मात्र काहीही फरक पडला नाही. भारताचा आत्माच बदलून टाकण्याची ग्वाही देऊन सत्तेवर आलेल्या मोदींमुळे मूळ भारताची संकल्पनाच विसरली गेली आहे असा आरोपही त्यांनी केला.

खासदार शशी थरूर यांनी मोदींच्या गेल्या साडे चार वर्षांच्या राजवटीतील खोटेपक्षा या पुस्तकात उघडा पाडला आहे. या पुस्तक प्रकाशन समारंभाला अन्य पक्षाच्या नेत्यांनाही त्यांनी पाचारण केले होत. त्यां नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका परिसंवादात अन्य नेत्यांनीही मोदींच्या कारभाराचा वाभाडे काढले. या कार्यक्रमाला भाजपचे माजी मंत्री अरूण शौरी, पी चिंदरबम, संयुक्त जनता दलाचे नेते पवन वर्मा इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)