मोदींसारखा पंतप्रधान देशाने आजपर्यंत पाहिला नसावा-बबिता फोगट

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सध्या देशामध्ये नकारात्मक भूमिका घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र मोदींविषयी एका व्यक्तीने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.मोदी हे खेळांविषयी आणि खेळाडुंमध्ये रस घेतात, त्यांच्याविषयी बोलतात, हे बघून बरे वाटते. क्रीडा क्षेत्रात इतका रस घेणारा पंतप्रधान देशाने आजपर्यंत पाहिला नसावा, असे मत राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेती कुस्तीपटू बबिता फोगटने व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीची प्रशंसा केली होती. तसेच सगळ्या विजेत्या खेळाडूंचे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले होते. या पार्श्वभूमीवर आज बबिता फोगट आणि सायना नेहवाल यांनी आज पंतप्रधान मोदींचे आभार मानले. सध्या खेळाडूंसाठी सर्वोत्कृष्ट काळ असल्याचे सांगताना, सगळ्या खेळांमध्ये चांगली कामगिरी होत असल्याचे सायनाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)